• अबकारी खात्याच्या रामदुर्ग उपविभागाची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी 

यरगट्टी - गोकाक राज्य मार्गावर ८४२१२ /- रुपये किंमतीचा बेकायदा मद्यसाठा जप्त करण्यात आला. सौंदत्ती तालुक्यातील यरगट्टी-गोकाक राज्य महामार्ग क्र.४५ वर गस्तीवेळी  संशयित मारुती अल्टो कार थांबवून झडती घेण्यात आली. त्यावेळी त्या कारमध्ये  ९० मिलीच्या २५ बॉक्समध्ये २४०० टेट्रा पॅकेट (२१६ एमएल) ओरिजिनल चॉईस व्हिस्की आढळून आली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. उत्पादन शुल्क निरीक्षकांनी ३,००,००० /- रुपये  किंमतीचे वाहन आणि ८४,३१२/- रुपयांचा मद्यसाठा जप्त करून रामदुर्ग उपविभागात गुन्हा दाखल केला आहे.

अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त, बेळगाव केंद्र व माननीय सहआयुक्त उत्पादन शुल्क, बेळगाव विभाग व माननीय उत्पादन शुल्क उपायुक्त, बेळगाव (दक्षिण) जिल्हा, बेळगाव हे उत्पादन शुल्क उपअधीक्षक, रामदुर्ग उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.