- चोरीच्या एकूण 23 दुचाकी जप्त
निपाणी / प्रतिनिधी
निपाणी शहरातील शिरगुप्पी क्रॉस नजीक २ अट्टल दुचाकी चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीच्या एकूण २२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची एकूण किंमत १६,१०,००० रू. इतकी आहे.
अटक केलेल्या आरोपींनी धारवाड जिल्ह्यातील उपनगरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत - २, मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत - १, एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत - १, मारिहाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत - ४, संकेश्वर पोलीस स्थानकाच्या हद्दीत - १, बैलहोंगल पोलीस स्थानकाच्या हद्दीत - १, बेळगाव शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत - १ यासह आणखी १२ दुचाकी चोरल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
जिल्हापोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त एसपी एम वेणुगोपाल ,चिक्कोडीचे डीएसपी बसवराज यलीगर, निप्पाणीचे सीपीआय एस सी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पी.एस.आय. विनोद पुजारी यांच्या नेतृत्वाखाली , निपाणी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व निपाणी शहर पोलीस ठाण्याचे एएसआय एम.जी.मुजावर, आर.जी.दिवती, पी. एम. गस्ती, एम. आय. कल्याणी, गजानन भोवी ., सलीम मुल्ला, मौलाना कलावंत, यासीन यांनी ही कारवाई केली.
जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी कारवाई केलेल्या पोलीस पथकाचे कौतुक केले असून बक्षीस जाहीर केले आहे.
0 Comments