- लोकायुक्त पोलिसां ची कारवाई
- जमिनीचे स्केच बनविण्यासाठी १० हजाराची केली होती मागणी
धारवाड / वार्ताहर
जमिनीचे ११ इ. स्केच तयार करण्यासाठी लाच मागणारे नवलगुंद भूमी अभिलेख सहाय्यक संचालक कार्यालयातील, वरिष्ठ भूमापक एम.एम.रामदुर्गे याना लाच घेताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ पकडले .
धारवाड येथील विश्वनाथ उन्नेमठ यांनी अर्ज केला होता. त्याच्या जमिनीचे ११ इ. स्केच तयार करण्यासाठी भूमी अभिलेख सहायक संचालक, नवलगुंद यांच्या कार्यालयातील वरिष्ठ भूमापन अधिकारी एम.एम.रामदुर्गे यांनी 10 हजारांची लाच मागितली. या संदर्भात कालच विश्वनाथ यांनी लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती .
0 Comments