- पदवीधर शिक्षक उमेदवारांची मागणी
- निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
आचारसंहितेपूर्वी नियुक्तीपत्र द्यावीत, म्हैसूर, बंगळुरू आणि बेळगाव या तीन शैक्षणिक विभागात पदवीधर प्राथमिक शाळेतील शिक्षकांची भरती लवकर करावी, या मागणीसाठी पदवीधर प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या उमेदवारांनी शनिवारी आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सदर मागणीचे निवेदन निवेदन देण्यात आले.
सरकारी शाळांमधील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी पंधरा हजार शिक्षकांची भरती करण्याचाही प्राथमिक शिक्षण विभागाचा विचार होता. गेल्या डिसेंबरमध्येचजी प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी होती. ती कायदेशीर गुंतागुंतीमुळे पूर्ण झालेली नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
म्हैसूर, बेंगळूर आणि बेळगाव या तीन शैक्षणिक विभागात पदवीधर प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या भरतीसाठीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाही. या प्रक्रियेला आधीच विलंब झालेला असतानाच आता विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने पुन्हा विलंब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काळजीत असलेल्या उमेदवारांनी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून नियुक्तीपत्र देण्याची मागणी केली.
अंतिम यादी मार्चमध्ये प्रसिद्ध झाली. पण हैदराबाद कर्नाटकच्या विशेष आरक्षणाला बगल देण्यात आली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला विलंब होण्याची भीती आहे. म्हैसूर, बंगलोर आणि बेळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात भरतीसाठी कोणतीही अडचण नाही. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता येण्यापूर्वी या विभागाची भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील ठिकठिकाणचे नियुक्तीपात्र उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments