सुळगा (हिं.) / वार्ताहर 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज  यांच्या बलिदान मास विषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव, कल्लेहोळ यांच्यावतीने आज गुरुवार दि. ९ मार्च रोजी सायं. ठीक ७.३० वा. कल्लेहोळ येथील श्री महालक्ष्मी मंदिरात कणबर्गी विभाग प्रमुख, श्री सिद्धेश्वर गोशाळेचे संस्थापक, गोरक्षक, संघटनेची मुलुख मैदानी तोफ, कट्टर शिवपाईक, निष्ठावंत धारकरी श्री हिरामणी दादा मुचंडीकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केलेले आहे. 

तरी कल्लेहोळ गावातील व बेळगाव तालुका विभागातील सर्व धारकरी व शिवप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.