बेळगाव / प्रतिनिधी 

धारवाडहून बेळगाव कडे येत असताना  के.के.कोप्पनजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने टाटा सुमो एका खड्ड्यात उलटली. यात १० जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या अपघातातून सर्वजण बचावले.

धारवाडहून केए २२ एन ७५७५ ही टाटा सुमो बेळगाव कडे येत होती. यावेळी के. के. कोप्पजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने टाटा सुमो उलटली. यावेळी गाडीमध्ये असलेले १० जण जखमी झाले. त्या जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आले एकाची प्रकृती गंभीर झाली होती.

जखमींना उपचारासाठी बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद हिरे बागेवाडी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.