सांबरा / मोहन हरजी
सांबरा येथील सार्वजनिक श्री शिवमुद्रा शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त रविवार दि 19 फेब्रुवारी रोजी किल्ले राजहंसगड येथे स्वच्छता मोहीम, शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि गरीब - गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सांबरा येथील आश्वारुढ शिवमुर्तीचे पूजन करुन कार्यकर्ते किल्ले राजहंसगडकडे रवाना होणार आहेत. सकाळी 10 वा सिद्धेश्वर मंदिरात पूजन करुन तटबंदीच्या भिंतीवर उगवलेली झाडे आणि वेली काढून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
सिद्धेश्वर मंदिरात दु 12 वा. 7 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्रवर आधारित निबंध स्पर्धा होणार आहे. दु 2 वा कोल्हापूर येथील रणमर्द शिलेदार संघटनेच्यावतीने शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन मांडून माहिती देण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या इच्छुकानी विक्रम सोनजी (मो.8147330400) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments