सांबरा / मोहन हरजी
सांबरा येथील श्री बिरदेव मंदिराचा वार्षिक उत्सव आजपासून सुरु होणार आहे. सोमवारी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.
शनिवारी टेकडीवरील बिळेबाई येथील मंदिर आवारात पालखीची स्वच्छता करुन पूजा आणि इतर धार्मिक विधी करुन प्रसादाचे वाटप होणार आहे. रविवारी सायंकाळी धनगरी ढोल वादन आणि जागर गायन होणार आहे. सोमवारी सकाळी मंदिरात अभिषेक, पूजा करुन पालखी मिरवणूक होणार आहे. ढोल-वाद्याच्या गजरात आणि भंडाऱ्याची उधळण करत पालखीची गाव प्रदक्षिणा होणार आहे. दु. 3 नंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे. गावकरी आणि भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे.
0 Comments