• विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन 

चिक्कोडी / वार्ताहर 

खडकलाट (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथे एका वृद्ध महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अवूताई भरमा गावडे (वय ८३) असे आत्महत्या केलेल्या वृद्धेचे नाव आहे.

सदर वृद्ध महिला मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा तिने आत्महत्या  केल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. दरम्यान माहिती मिळताच खडकलाट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला.  या प्रकरणाची नोंद खडकलाट पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.