- गळफास घेऊन संपविले जीवन
निपाणी / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्याच्या निपाणी तालुक्यातील बोरगाव शहरात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जितेंद्र गिरेप्पा गाजरे (41) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे.मृत जितेंद्र गाजरे यांना श्वसनाचा आजार होता. आजारपणाला कंटाळून त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.याप्रकरणी सदलगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments