- चिक्कोडी तालुक्याच्या येदूरवाडी गावातील घटना
चिक्कोडी / वार्ताहर
शेतातील पिकांना पाणी देण्याकरिता विद्युत पंप सुरू करण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. येदूरवाडी (ता. चिक्कोडी) येथे ही दुर्दैवी घटना घडली. गणपती संभा माने (वय ५२, रा.येदूरवाडी ता. चिक्कोडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणाची नोंद अंकली पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments