चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र - कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवरवाडी (ता. चंदगड) येथील श्री वैजनाथ देवस्थान मंदिर परिसरात दि. १८ रोजी होणाऱ्या महाशिवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वैजनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपस्थितीकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मंदिर परिसरातील गवत, झुडपे, पालापाचोळा, प्लॅस्टिक स्वच्छ करून नूतन सल्लागार समितीने वेगळा उपक्रम राबविला. या शनिवारी होणाऱ्या महाशिवरात्रीला पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच दुचाकी, चारचाकी गाडी वाहन तळासाठी व्यवस्था केली आहे.
या स्वच्छता मोहिमेत श्रीमती गीतांजली सुतार, शंकर वैजू भोगण, विनोद मजुकर, प्रा. नागेंद्र जाधव, उपसरपंच गोविंद आडाव, पोलीस पाटील जयवंत कांबळे, शिवाजी भोमानी भोगण, संजय भोगण, पुंडलिक दीक्षित, लक्ष्मण केसरकर, रामा कांबळे, महादेव सुतार, विजय सुतार, शिवकुमार पुजारी, अमोल भोगण, अनिल मजुकर, उमेश भांदुर्गे, संतोष पाटील, मष्णू कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, संघर्ष प्रज्ञावंत आदी मंडळींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबवली.
0 Comments