• युवा काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांच्यावतीने आयोजन

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर काँग्रेस युवा नेते इरफान तालिकोटी यांच्यावतीने खास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन रविवारी दि १९ रोजी सायंकाळी ५.३० वा. येथील सर्वोदय इंग्रजी हायस्कूलच्या पटांगणावर ग्रुप डान्स व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील युवा पिढीला तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळा विद्यार्थी वर्गासाठी चांगले व्यासपीठ मिळावे. त्यांच्या चांगल्या गुणांना वाव मिळावा. या उद्देशाने खानापूर काँग्रेस  युवा नेते इरफान तालिकोटी  यांनी स्वतः या स्पर्धेचे आयोजन केले आहे. विजयी स्पर्धकांना बक्षिसे पुढील प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहेत. ग्रुप डान्स बक्षिसे पुढील प्रमाणे ओपन स्टेट लेव्हल पहिले बक्षिस २२,२२२ रूपये, दुसरे बक्षिस १५,५५५ रूपये, तिसरे बक्षिस ११,१११ रूपये.

हायस्कूल लेव्हल फक्त खानापूर तालुका

पहिले बक्षिस १५,५५५रूपये, दुसरे बक्षिस ११,१११ रूपये, तिसरे बक्षिस ७,७७७रूपये, उच्च प्राथमिक स्कूल लेव्हल पहिले बक्षिस १५,५५५रूपये,दुसरे बक्षिस ११,१११रूपये, तिसरे बक्षिस ७,७७७ रूपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

गायन स्पर्धेसाठी बक्षिसे पुढील प्रमाणे ओपन स्टेट लेव्हलसाठी पहिले बक्षिस ७,७७७ रूपये, दुसरे बक्षिस ५,५५५ रूपये, तिसरे बक्षिस ३,३३३ रूपये हायस्कूल लेव्हल फक्त खानापूर तालुक्यासाठीपहिले बक्षिस ५,५५५ रूपये, दुसरे बक्षिस ३,३३३रूपये, तिसरे बक्षिस २,२२२ रूपये अशी भव्य बक्षिसे देण्यात येणार आहेत. यावेळी स्पर्धेसाठी मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती खानापूर काॅग्रेस युवा नेते इरफान तालिकोटी यानी बोलताना दिली.तेव्हा स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन यावेळी खानापूर काॅग्रेस युवा नेते इरफान तालिकोटी यानी केले आहे.