खानापूर / प्रतिनिधी

श्री साई कृष्ण प्रतिष्ठान खानापूर याच्या वतीने उद्या शुक्रवारी दि १२ रोजी बरगांव जवळील श्री साई मंगल कार्यालयाच्या आवारात दुपारी तीन वाजता जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रथम क्रमांकाची कुस्ती डब्बल कर्नाटक केसरी पै कार्तिक काटे विरूद्ध पै कमळजीत पंजाब, व्दितीय क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी पै संगमेश बिराजदार विरूध्द पै राकेश कुमार पंजाब, तृतीय क्रमांकाची कुस्ती पै कालीचरण बिराजदार विरूध्द पै किर्ती कुमार कार्ये याच्यात होणार आहे.
याचबरोबर एकूण ४१ कुस्त्या होणार आहेत.

यावेळी आखाड्याच्या अध्यक्ष स्थानी के पी पाटील उपस्थित राहणार आहेत.तर आखाड्याचे उदघाटन व पुजन गुरुवर्य परशुभाऊ नंदीहळ्ळी व गोपाळ महाराज याच्या हस्ते होणार आहे. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटो पुजन होणार आहे. तरी कुस्ती शौकीनानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.