• काला पत्थर संघ उपविजेता  : उत्तम पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण

बोरगाव / वार्ताहर 

बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह व टॉप स्टार क्रिकेट क्लब तर्फे येथील मुन्सिपल हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित 'अरिहंत चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना रोमहर्षक होऊन रिच फार्मस संघाने अरिहंत चषकावर आपले नाव कोरले. तर काला पत्थर संघाच्या खेळाडूंनीही अटीतटीच्या सामन्यात उत्तम खेळी करून उपविजेतेपद पटकाविले.अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या प्रमुख उपस्थित दोन्ही संघांना उत्तम पाटील यांच्या हस्ते अनुक्रमे १ लाख रुपये व चषक आणि ७५ हजार रुपये आणि चषक घेऊन गौरविण्यात आले. अंतिम सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट प्रेमीमुळे गॅलरी खचाखच भरली होती.

स्पर्धेतील तृतीय क्रमांक अथर्व स्पोर्ट्स तर चौथा क्रमांक मिळवलेल्या गुजरात लॉयन्स या संघांना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख व चषक देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेमधील अंतिम सामना रिच फार्मस आणि काला पत्थर यांच्यात झाला. यावेळी काला पत्थर संघाने ४९ धावा काढून तीन गडी गमावले. त्यामध्ये संजय जबडे याच्या २६ यांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल खेळताना रिच फार्मस संघाने ७ चेंडू राखून काला पत्थर संघावर विजय मिळवला.

 स्पर्धेतील मॅन ऑफ दी सिरीज नरेंद्र उर्फ बबलू मांगुरे,  उत्कृष्ट फलंदाज निरंजन परीट, उत्कृष्ट गोलंदाज विकास चव्हाण,अंतिम सामन्यातील सामनावीर संजय जबडे यांना निरंजन पाटील- सरकार, गजानन कावडकर, अनिल संकपाळ व मान्यवरांच्याहस्ते गौरवण्यात आले.

या वेळी डॉ. सी. बी. कुरबेट्टी, नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय सांगावकर, दिलीप पठाडे,,शौकत मनेर, संजय पावले, अनिस मुल्ला, दत्ता नाईक,दीपक सावंत, विनायक वडे, सुनील शेकर, पांडुरंग भोई, अभय मगदूम, बाळासाहेब सुर्यवंशी, प्रा. शिवाजी मोरे, निरंजन पाटील, संजय पाटील, अरुण निकाडे, सचिन इटेकरी, मक्सुद मोमीनदादा, राजेंद्र कंगळे, विनायक फुटाणकर, शशीकुमार गोरवाडे, अनिल संकपाळ, गजानन कावडकर, टॉप स्टार चे मैनुद्दीन मुल्ला, अनिल भोसले, गोपाळ नाईक, रवी गुळगुळे, शिरीष कमते, इम्रान मकानदार यांच्यासह टॉपस्टार क्लबचे सदस्य उपस्थित होते.

महेश बुवांनी जिंकली रसिकांची मने 

क्रिकेट स्पर्धेसाठी डान्सिंग पंच म्हणून चिमगाव ( ता. कागल) येथील महेश बुवा हे चार दिवसापूर्वी कार्यरत होते. प्रत्येक घटनेच्या वेळी विविध प्रकारचे डान्स करून त्यांनी रसिकांची मने जिंकली. यावेळी डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी, उत्तम पाटील युवा शक्ती सोशल मीडिया यांच्यासह मान्यवरांनी त्यांना बक्षीस देऊन सन्मानित केले.

वडील, मुलगा एकाच संघात 

काला पत्थर संघातून उत्कृष्ट फलंदाज मैनुद्दीन मुल्ला आणि त्यांचा मुलगा हादी मुल्ला त्यांनी एका संघात सहभाग घेऊन निपाणीकरांना चांगली खेळी करून दाखवली. यावेळी मैदानात हा चर्चेचा विषय ठरला.