बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठात , 23 केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू शरणप्पा हालसे यांनी दिली.
बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली . ते म्हणाले की , कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र संगोळी रायण्णा महाविद्यालय, नेहरू नगर येथे कार्यरत असून, बेळगाव शहर व ग्रामीण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नजीकच्या कार्यालयास भेट देऊन जागेवरच प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी संपूर्ण फी भरून प्रवेश घेऊ शकतात आणि नंतर राज्य शिष्यवृत्तीद्वारे समाज कल्याण विभागाकडून फी प्रतिपूर्ती मिळवू शकतात. बीपीएल आयडी 9 असलेल्या महिला विद्यार्थ्यांना 15% ट्यूशन फी सवलत मिळू शकते, तसेच, तृतीयलिंगी विद्यार्थ्यांना संपूर्ण फी सवलत मिळेल, असे ते म्हणाले.
प्रत्येक गावातील मुलांना उच्च शिक्षण मिळावे या उद्देशाने सर्वाना उच्च शिक्षण मिळावे. आमचे विद्यापीठ नियमित विद्यापीठांच्या उच्च शिक्षणाच्या बरोबरीने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देण्याची सेवा सतत देत राहील. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी , मल्लिकार्जुन, भास्कर आदी उपस्थित होते.
0 Comments