- गळफास घेऊन संपविले जीवन
बेळगाव / प्रतिनिधी
हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) येथील एका कापड दुकानात काम करणाऱ्या युवकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली आहे. शामराज फकिराप्पा पट्टणशेट्टी (वय ३६, रा. पेठ गल्ली, हिरेबागेवाडी) असे त्याचे नाव आहे. शनिवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.०५ या वेळेत शामराजने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
आत्महत्येचा प्रकार उघडकीस येताच त्याला वाचविण्याचा प्रयत्न झाला. उपचारासाठी त्याला हिरेबागेवाडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सीआरपीसी कलम १७४ (सी) अन्वये संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक अमरेश बी अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी शामराजची पत्नी ज्योती हिने फिर्याद दिली आहे. शामराज गावातील एका कापड दुकानात काम करीत होता. त्याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली याचा उलगडा झाला नाही, म्हणून पत्नीने संशय व्यक्त केला आहे. तपासानंतरच निश्चित कारण समजणार आहे.
0 Comments