बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहराच्या कायदा सुव्यवस्था पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झालेले शेखर एच. टेक्कन्नवर यांनी आज बुधवार दि. १ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला. ते (केएन -२०१४) बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
नुकत्याच राज्यातील १३ आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये रवींद्र गडादी उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्यासह बेळगाव येथील चार पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्या आदेशानुसार बेळगाव शहराच्या कायदा सुव्यवस्था विभागाचे नवे पोलीस उपायुक्त म्हणून आयपीएस अधिकारी शेखर टेक्कन्नवर यांनी आज बुधवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. कर्नाटक राज्य गृह विभागाने पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांची बदली करून त्यांच्या रिक्तपदी शेखर टेक्कन्नवर यांची नियुक्ती केली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व एकाच ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
0 Comments