विजयपूर / वार्ताहर 

कालव्यात पडून शालेय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील चिक्कअसंगी गावाच्या हद्दीत घडली.

कल्लैया हिरेमठ (वय १३असे मृत मुलाचे नाव आहेहा मुलगा शाळेतून घरी आल्यावर वडिलांना भेटण्यासाठी शेतात गेला होतायावेळी तो मुलगा पाय घसरून भरून येणाऱ्या कालव्यात पडला आणि त्याचा मृत्यू झालामुलगा घरी न परतल्याने त्याचा शोध घेण्यात आलामात्र सकाळी मुलाचा मृतदेह कालव्यात आढळून आला.मुलवाड पाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात ही घटना घडली असून घटनास्थळी ठिकाणी कोल्हार पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली .