• सिंदगी पोलिसांची कारवाई 
  • २ देशी पिस्तुल, ८ जिवंत काडतूसे , दुचाकीसह ९० हजार रु. किंमतीच्या वस्तू  हस्तगत

विजयपूर / वार्ताहर 

गोळीबार करून सुवर्णकाराचे दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच दरोडेखोरांना अटक करण्यात  पोलिसांना यश आले. विजापुर जिल्ह्याच्या सिंदगी शहरात ही कारवाई  करण्यात आली. या पाच जणांनी हवेतगोळीबार  करून दि. १३ फेब्रुवारी  रोजी सायंकाळी ७ वा. सुमारास सिंदगी शहरातील चामुंडेश्वरी ज्वेलर्स हे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला होता. राजा सौदागर, प्रदीप कलबुर, राहुल बागुल, मुदकप्पा कट्टीमणी, बजरंगी रामराव पाटील अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

त्यांच्याकडून  २ देशी पिस्तुल, ८ जिवंत काडतूसे , दुचाकीसह ९० हजार रु. किंमतीच्या वस्तू  हस्तगत करण्यात आल्या आहेत.

अटक केलेल्या आरोपींना  न्यायालयापुढे हजर केले असता. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी  सिंदगी पोलिस स्थानकात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.