हुक्केरी / वार्ताहर
दुकानाच्या बाथरूममध्ये लावलेल्या गीझरच्या सिलिंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या लाखोंच्या मालाचे नुकसान झाल्याची घटना जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी येथे घडली.
हे दुकान बेल्लद बागेवाडी येथील दुंडाप्पा खानापुर यांचे आहे. सकाळी नेहमीप्रमाणे ते दुकान उडण्यासाठी आले असताना त्यांना किराणा दुकानाच्या बाथरूममधील सिलिंडरमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले . सावधगिरी बाळगून ते दुकानाबाहेर पडले.
त्यानंतर, सिलिंडरची गळती होऊन लागलेल्या आगीत , किराणा दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. खबरदारीमुळे दुकानदाराचा जीव वाचला .सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. हुक्केरी सीपीआय रफिक तहसीलदार व त्यांचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली व पुढील हानी टळली.
0 Comments