बेळगाव / प्रतिनिधी
महाशिवरात्री व शिवजयंती निमित्त संतीबस्तवाड येथील जय भवानी ग्रुपतर्फे उद्या शनिवार दि. 18 ते रविवार दि 26 फेब्रुवारी या कालावधीत भव्य बक्षीस रकमेच्या 'श्री जय भवानी ट्रॉफी' टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवाजीनगर, संतीबस्तवाड येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिर मैदानावर सदर स्पर्धा खेळविली जाणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेत्या संघाला दिले जाणारे 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे पारितोषिक बेळगुंदीचे माजी जि. पं. सदस्य मोहन यल्लाप्पा मोरे यांनी पुरस्कृत केले आहे. स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे 50 हजार 555 रुपयांचे पारितोषिक म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, सौंदर्या पेंटस् चे आर. आय. पाटील, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, महादेव बिर्जे व रामा पाटील यांनी पुरस्कृत केले आहे.
स्पर्धेतील मालिकावीर किताब विजेत्या खेळाडूला राजेश रेवणकर यांच्याकडून 'इलेक्ट्रिक बाईक' बक्षिसा दाखल दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि विकेट हॅटट्रिक अशी आकर्षक वैयक्तिक पारितोषिके पुरस्कृत करण्यात आली आहेत. सदर स्पर्धेचे उद्घाटन आज शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता सातेरी मंदिर संतीबस्तवाड येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. त्यानंतर उद्या रविवारपासून स्पर्धेला रीतसर सुरुवात होणार आहे.
0 Comments