- बाग परिवारातर्फे काव्यवाचनाचा कार्यक्रम खेळीमेळीत
बेळगाव / प्रतिनिधी
बाग परिवार या साहित्यिक समूहाचा विविध साहित्य वाचनाचा कार्यक्रम नुकताच अस्मिता आळतेकर यांच्या घरी पार पडला. आनंद मेणशी यांनी प्रास्ताविक करून सुरुवात केली. चंद्रशेखर गायकवाड यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. अस्मिता आळतेकर, शीतल पाटील व मेघा भंडारी यांनी मंथन स्पर्धेतील भा. रा. तांब्यांच्या कवितांचे रसग्रहण सादर केले. भरत गावडे यांनी जोतिबाच्या नावानं चांगभलं, मधु पाटील यांनी मातृत्व,आनंद मेणशी यांनी पानगळ, चंद्रशेखर गायकवाड यांनी व्हॅलेंटाईन डे, स्मिता किल्लेकर यांनी हिंदी कविता चौकट,रोशनी हुंद्रे यांनी सौमित्र, अस्मिता देशपांडे यांनी भारतमातेच्या लोकांनो, धनश्री मुचंडी यांनी नाते व निकिता भडकुंबे यांनी आयुष्य अशा कविता सादर केल्या. तसेच अंजली देशपांडे यांनी प्रवास युगांच्या पाऊलखुणांचा हे प्रवास वर्णन अतिशय सुंदर शब्दांत सादर केले. निकिता भडकुंबे यांनी आभार मानले.
अशाप्रकारे साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारांची पुष्पे बागेत सजली. वेगवेगळ्या विषयांवर चर्चाही झाली. सरते शेवटी अस्मिता आळतेकरांनी प्रेमळ पाहुणचार करत स्वादिष्ट अल्पोपहार खाऊ घातला व अतिशय खेळीमेळीच्या आनंदी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. मराठी भाषा दिनानिमीत्त कार्यक्रम करण्याविषयी चर्चाही पार पडली.
0 Comments