- अन्य एकजण गंभीर जखमी
विजयपूर / वार्ताहर
दुचाकी आणि क्रुझर यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार तर दुचाकी वरील अन्य एक जण गंभीर जखमी झाला. तळेवाड (ता. कोल्हार जि. विजयपूर) येथे मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
संगप्पा सिंदगी (वय ३९) मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर मल्लाप्पा बाल्याळ हा गंभीर जखमी झालाअसून उपचारासाठी त्याला विजयपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनटीपीसी कुडगी पोलीस स्थानकाच्या हद्दीत अपघात घडला असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
0 Comments