- रुग्णवाहिका आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक
- आठहून अधिक जण जखमी
हुबळी / वार्ताहर
यल्लमा देवीचे दर्शन घेऊन राणेबेन्नूर येथे परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो आणि रुग्णवाहिका यांच्या अपघातात आठहून अधिक जण जखमी झाले. हुबळीतील देशपांडे नगर नजीक ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, यल्लमा डोंगरातून देवीचे दर्शन घेऊन राणेबेन्नूरकडे परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो आणि गदगहून किम्सकडे येणारी रुग्णवाहिका यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. सदर अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेतून किम्स येथे आणण्यात आले. रुग्णवाहिका चालक किरकोळ जखमी झाला असून इतर जखमींवर हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments