कमलापूर येथील बसप्पा कमती यांच्या मालकीच्या शेडला अचानक आग लागली. बसप्पा कमलापूरच्या शिवारात शेड बांधून तेथेच बैल बांधायचे. तसेच याच शेडमध्ये त्यांनी २५ पोती सोयाबीनचा साठा केला होता. मात्र काल रात्री या शेडला अचानक आग लागून एका बैलाचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तसेच साठवलेले धान्य आणि अन्य साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. या घटनेनंतर धारवाड उपनगरीय पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
0 Comments