बेळगाव / प्रतिनिधी 

प्रतिवर्षी प्रमाणे जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून म. ए. युवा समितीतर्फे शनिवार दि. २५ फेब्रुवारी रोजी दु. ४:०० वाजता मराठा मंदिर, गावावेस बेळगाव येथे मराठी भाषा गौरव दिन सोहळा, सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण आणि आदर्श शाळा पुरस्कार वितरण असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तरी सर्वांनी  उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन समस्त महाराष्ट्र एकीकरण युवा समिती परिवारातर्फे करण्यात आले आहे.