खानापूर /प्रतिनिधी

कुसमळी (ता खानापूर) तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष,जांबोटी मल्टी पर्पज सोसायटीचे संस्थापक, चेअरमन विलास बेळगावकर यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शुक्रवार दि. १० फेब्रुवारी रोजी खानापूरच्या सरकारी दवाखान्यातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. 


यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, म .ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, युवा नेते यशवंत बिर्जे , प्रकाश चव्हाण, मारूती परमेकर,जेष्ठ नेते शंकर पाटील, फकिरा सावंत, धनंजय सरदेसाई, सुनिल पाटील, पुंडलिक पाटील, म्हत्रू धबाले,आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील तसेच जांबोटी सोसायटीचे सभासद, मॅनेजर, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


प्रारंभी माजी आमदार दिगंबर पाटील व उपस्थित मान्यवरांनी सरकारी दवाखान्यात विलास बेळगावकर यांना पुष्प गुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सरकारी दवाखान्यातील जवळपास १०० रुग्णांना फळे वाटून त्याची विचारपूस केली.