गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकातील उपनिरीक्षक फकीराप्पा वाय. तळवार (वय ५५) यांचे शुक्रवारी आकस्मिक निधन झाले. ते बागलकोट जिल्ह्यातील बिळगी तालुक्यातील शिरगुप्पी गावचे रहिवासी होते.
हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महालिंगपूर पोलीस स्थानकातून त्यांची गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात बदली झाली होती. आठवडाभरापूर्वीच ते येथे रुजू झाले होते.
ते गोकाक शहरातील एका खोलीत राहत होते. शुक्रवारी दुपारपर्यंत ही ते खोलीबाहेर न आल्याने पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले असता ते मृतावस्थेत आढळले.
0 Comments