सांबरा / मोहन हरजी 

मुतगा येथे हनुमान यात्रेनिमित्त रविवार दि. 2 एप्रिल रोजी निकाली कुस्ती मैदान भरवण्याचा निर्णय मारुती मंदिरात गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. 

मैदान नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.  महारष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर भारतातील नामवंत मल्लाना निमत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला पै.भावकाना पाटील,  श्रीकांत पाटील, आप्पाना बस्तवाड, जोतिबा केदार, सातेरी पाटील, सुहास पाटील, नवीन पाटील, तुकाराम पाटील, नामदेव पाटील, जानबा पाटील, जयसिंग पाटील, कृष्णा शिंदोळकर, सिद्दाप्पा पाटील, बसवराज कोरी, चंद्रकांत पाटील, बाळकृष्ण पाटील, सयाजी पाटील , भैय्याजी पाटील यांच्यासह कुस्ती कमिटीचे सदस्य, गावकरी उपस्थित होते.