खानापूर / प्रतिनिधी 

रामनगरजवळ झालेल्या भीषण अपघातात गार्ली गावातील कल्पना भरमण्णा गावडा, पार्वती गावडा आणि पार्वती पोदुस्कर यांचा मृत्यू झाला होता. भाजप नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी शोकाकुल कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.

खानापूर तालुक्यातील रामनगरजवळ दोन दिवसांपूर्वी भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांची भाजप नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी महालक्ष्मी ग्रुप पुरस्कृत लैला शुगर्स कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील आदी उपस्थित होते.