बेळगाव / प्रतिनिधी
बहुप्रतिक्षित असलेल्या बेळगाव महापालिकेच्या महापौर - उपमहापौर पदाच्या निवडणुकीची अधिसूचना आज गुरुवारी सायंकाळपर्यंत जारी होण्याची शक्यता आहे.
गेल्या ९ तारखेला नगर विकास विभागाच्या अप्पर सचिवांनी २१ व्या सभागृहासाठी निवडणूक घेण्याचे पत्र पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावचे प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ या संदर्भात अधिकृत नोटीस बजावून प्रक्रिया सुरू करणार आहेत. त्यानुसार 31 जानेवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. बेळगाव महानगरपालिकेचे महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी तर उपमहापौरपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहे.
0 Comments