• विजयपूर जिल्ह्याच्या बबलेश्वर तालुक्यातील घटना

विजयपूर / वार्ताहर  

एका चालत्या ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. यावेळी टायर फुटलेल्या ट्रकची समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात एका ट्रकचा चालक जागीच ठार झाला  तर दुसरा ट्रक चालक गंभीररीत्या जखमी झाला आहे. विजयपूर जिल्ह्याच्या बबलेश्वर तालुक्यातील कारजोळ क्रॉसनजीक बबलेश्वर पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा अपघात घडला. 

प्रभुलाल गुज्जल (रा. राजस्थान) असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे. तसेच दुसरा चालक गंभीर जखमी झाला असून अधिक उपचारासाठी  त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माहिती मिळताच बबलेश्वर  पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. बबलेश्वर पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.