• २ एकरातील ऊस जळून भस्मसात 
  • अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान 
  • सांबरा शिवारातील घटना

सांबरा / मोहन हरजी 

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकरात पिकवलेला सुमारे ९ टन ऊस जळून भस्मसात झाला.आज बुधवारी सांबरा (ता. बेळगाव) येथील शिवारात ही घटना घडली. सुनील देसाई व धनंजय देसाई अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत. या घटनेत सदर शेतकऱ्यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच मारीहाळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करून पंचनामा केला.