हुबळी / वार्ताहर
कर्नाटकातील एक प्रमुख शहर असलेल्या वाणिज्य नगरी हुबळी येथे उद्यापासून 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उदघाटन होणार असलेल्या या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून ती पूर्णत्वाकडे पोहोचली आहे.
हुबळी येथे उद्यापासून 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. सप्ताहभर चालणाऱ्या या युवा महोत्सवाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्या गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास होणार आहे. त्यासाठी धारवाड जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण तयारी पूर्णत्वाकडे पोहोचली असून, सहभागी युवकांच्या राहण्या-जेवणाची सोय करण्यात आली आहे.
0 Comments