सुळगा (हिं.) / वार्ताहर

प्रत्येक गावात दूध व्यावसायिकाला स्वतःचे महत्त्व प्राप्त झाले आहे. हा व्यवसाय नियमित उत्पन्न देणारा आहे. आज बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक गावात महिला दुग्धव्यवसाय करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत आहेत. खऱ्या अर्थाने भारतीय दुग्ध क्षेत्राच्या विकासात महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. 


सोमनाथनगर, केकेकोप्प ता. बेळगाव येथील न्यू दूध उत्पादक सहकारी संस्था आणि श्री स्वामी विवेकानंद युवा संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.


दरम्यान गुरांच्या आरोग्याच्या दृष्टीने गावात लसीकरण मोहीमही राबविण्यात आली. याप्रसंगी खा.मंगला सुरेश अंगडी, केकेकोप्प ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सर्व सदस्य, सोमप्पा हदगल, मोहन अंगडी, यल्लाप्पा दोडवडी, नागाप्पा येळळूर यांच्यासह गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.