• आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते चालना 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या बेकिनकेरे गावात शुक्रवार ६ जानेवारी रोजी काँक्रीट रस्त्यांच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पूजन करून या कामाला चालना देण्यात आली.

उद्घाटनानंतर आ. हेब्बाळकर म्हणाल्या, बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या प्रत्येक गावातील रस्त्यांच्या विकासासाठी आमदार निधीतून भरीव निधी दिला आहे. दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि दर्जेदार रस्त्यांच्या बांधणीवर भर दिला जात आहे. जनतेनेही रस्ते दीर्घकाळ टिकण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, व सोयी सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.


याप्रसंगी युवराजअण्णा कदम, ग्रा. पं.अध्यक्ष, ग्रा. पं. सदस्य यांच्यासह ज्येष्ठ नेते, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.