• आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमीपूजन 

सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या कर्ले गावातील स्मशानभूमीला जोडणाऱ्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सरकारकडे पाठपुरावा करून  या रस्त्याच्या कामासाठी  ४० लाख  रु. निधी मंजूर करून घेतला आहे. आज ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमीपूजन करून या कामाला चालना देण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते युवराजअण्णा कदम, युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर, नामदेव खेमनाळकर, शंकर गोवेकर, वसंत सांबरेकर, विनायक पाटील, अमृत खेमनाळकर, स्नेहल सुतार,जयवंत पाटील, निंगाप्पा अवचारी, रामलिंग कुगजी, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.