• विजयपूर जिल्ह्याच्या बसवन बागेवाडी तालुक्यातील घटना
  • व्यवसायातील नुकसानीमुळे आत्महत्या केल्याचा संशय

विजयपूर / वार्ताहर 

विजयपूर जिल्ह्याच्या बसवन बागेवाडी तालुक्यातील कुडारी - सालवदगी मार्गावर एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बसवन बागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत आज दुपारच्या सुमारास घडली.

बसवराज कोटी (वय ३६, रा. यलवार ता. बसवन बागेवाडी, जि. विजयपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्याने  कालसंती येथे व्यवसाय केला असून, व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची नोंद बसवन बागेवाडी  पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.