आजरा / प्रतिनिधी
आजरा येथे उद्या रविवार दि. २२ जानेवारी रोजी बेळगाव येथील सीमा लढ्यातील जेष्ठ नेते काँ.कृष्णा मेणसे यांना जेष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या हस्ते द.ना गव्हाणकर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार हसन मुश्रीफ, प्रकाश अबिटकर, राजेश पाटील, नगराध्यक्षा जोत्सना चराटी, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, महागोंड येथील सरपंच जयश्री देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
गंगामाई वाचनालयात दुपारी १२ वा. पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याचे आवाहन पुरस्कार समितीचे अध्यक्ष रवींद्र आपटे,उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी,कार्याध्यक्ष काँ.संपत देसाई, खजिनदार सुनिल पाटील यांच्यासह पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments