बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यातून शिवप्रभू दौडीमध्ये भाग घेणाऱ्या धारकऱ्यांची संख्या सर्वाधिक होत असल्याने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष व सरसेनापती यांच्या आदेशावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव जिल्हाप्रमुख किरण बापू गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी  शिवप्रभू दौडीमध्ये भाग घेणाऱ्या वारकऱ्यांसाठी बेळगावमध्ये प्रथमच  शिवप्रभू दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठीक ६ वाजता राजहंस गड बेळगाव याठिकाणी ही दौड होणार आहे. सदर दौडीमध्ये नंबर पटकावलेल्या पहिल्या पाच धारकऱ्यांना क्रमांक एक ते पाच अशी बक्षीसे व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

प्रथम क्रमांकासाठी रु. ५००१/-, द्वितीय क्रमांकासाठी रु. ४००१/-, तृतीय क्रमांकासाठी रु. ३००१/- चौथ्या क्रमांकासाठी रु. २००१/- पाचव्या क्रमांकासाठी रु. १००१/- अशी बक्षिसांची रक्कम असणार आहे. तरी अधिकाधिक धारकऱ्यांनी या शिवप्रभू दौडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव तर्फे करण्यात आले आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे प्रतिवर्षी गडकोट मोहिमेपूर्वी ही शिवप्रभूदौड आयोजित केली जाते. या दौडीमधून पुढील मोहिमेच्या ध्वजधारीची निवड केली जाते. यंदा दि. २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी पर्यंत श्री भीमाशंकर ते श्री शिवनेरी मार्गे वरसुबाई पर्यंत गडकोट मोहीम २०२३ होणार आहे.