- आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते भूमिपूजन
सुळगा (हिं.) / वार्ताहर
मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गत साडेचार वर्षात भरीव निधी मंजूर करून बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा 'न-भूतो ; न- भविष्यती' असा विकास केला आहे. यामध्ये मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. रस्त्यांच्या बाबतीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघ राज्यात आदर्श बनावा याकरिता रस्त्यांचा विकास साधला जात आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागात असलेल्या विविध गावातील रस्त्यांच्या विकासाला चालना देण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी तालुक्याच्या पश्चिम भागातील सुळगा (हिं.) गावात क्रॉस क्र.१ वेंगुर्ला रोड ते शिवाजी व्यायाममंडळ, क्रॉस क्र. ३ मराठी शाळा ते विठ्ठल मंदिर आणि क्रॉस क्र.५ वेंगुर्ला रोड ते मल्लाप्पा भातकांडे यांच्या घरापर्यंत अशा तीन ठिकाणच्या रस्त्यांच्या विकासकामाला आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून चालना देण्यात आली.
क्रॉस क्र. १ येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात ग्रा. पं. सदस्य मारुती भरमा पाटील यांनी पूजन करून श्रीफळ वाढविले.
यानंतर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते भूमिपूजन करून रस्त्याच्या विकास कामाला चालना देण्यात आली.
यावेळी ग्रा. पं. सदस्य मारुती भरमा पाटील यांनी आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांबद्दल ग्रामस्थ व ग्रा. पं. च्या वतीने त्यांचे आभार मानले. तर आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गावच्या विकासात कोणीही राजकारण आणू नये असे आवाहन केले.
क्रॉस क्र. ३ येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा कलखांबकर, ग्रा. पं. महादेव कंग्राळकर यांनी पूजन केले. तर ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा कलखांबकर यांनी श्रीफळ वाढविले.
यानंतर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते भूमिपूजन करून रस्त्याच्या विकास कामाला चालना देण्यात आली.
यावेळी बोलताना ग्रा. पं. सदस्य महादेव कंग्राळकर यांनी आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांचे गावातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सुळगा ग्रा. पं. आणि गावाच्यावतीने आभार मानले. तसेच येत्या निवडणुकीत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना पाठिंबा देणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले.
क्रॉस क्र. ५ येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराजअण्णा कदम यांनी पूजन करून श्रीफळ वाढविले.
यानंतर आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून रस्त्याच्या विकास कामाला चालना देण्यात आली.
या कार्यक्रमाला एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराजअण्णा कदम ग्रा. पं. अध्यक्षा निर्मला कलखांबकर, ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा कलखांबकर, भागाण्णा नरोटी, महादेव कंग्राळकर, मारुती भरमा पाटील, मल्लाप्पा उचगावकर, वर्षा सांगावकर, राजश्री कोलकार यांच्याशिवाय मनोज कलखांबकर, उमेश पाटील, यल्लाप्पा कणबरकर, माजी ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा उचगावकर, परशराम तोरे, भैरु पाटील, भरतेश उचगावकर, रेखा पाटील, दीपा तोरे, वैष्णवी खटावकर, सविता चौगुले, लक्ष्मी कलखांबकर सरस्वती कलखांबकर यांच्यासह गावातील इतर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments