- विजयपूर जिल्ह्याच्या बसवन बागेवाडी तालुक्यातील घटना
विजयपूर / वार्ताहर
प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजयपूर जिल्ह्याच्या बसवन बागेवाडी तालुक्यातील जैनापूर येथे घडली आहे. राकेश अर्जुन अंगडी (वय २३) व सावित्री मल्लाप्पा अंबाली (वय १९) अशी मृतांची नावे आहेत. जैनापूर गावात बसवन बागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. मंगळवारी रात्रीच राकेश आणि सावित्री घरातून बाहेर पडल्याची माहिती प्राप्त झाली असून दोघांचेही गत दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते अशी चर्चा आहे. या घटनेची नोंद बसवन बागेवाडी पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments