• विजयपूर जिल्ह्याच्या तिकोटा तालुक्यातील अरकेरी गावानजीक घटना 
  • हत्येनंतर हल्लेखोर फरार 

विजयपूर / वार्ताहर 

मंदिराच्या सेवेकऱ्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना विजयपूर जिल्ह्याच्या तिकोटा तालुक्यातील अरकेरी गावानजीक अमोघसिद्ध देवस्थानच्या परिसरातील भूतानसिध्द देवस्थानात घडली आहे. हत्येनंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. परसप्पा गुंडकरजगी  (वय ५५ रा. दकमेटी, ता. बसवन बागेवाडी )असे मृताचे नाव आहे. काही दिवसांपासून तो अरकेरीतील भूतानसिद्ध देवस्थान येथे सेवा करत होता. विजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

आज सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी विजयपूर ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच विजयपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या घटनेची नोंद विजयपूर ग्रामीण पोलीस स्थानकात झालीअसून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.