• जिल्हा पोलीस प्रमुख एच.डी.आनंदकुमार यांची माहिती 

विजयपूर / वार्ताहर 

तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती विजयपूरचे जिल्हा पोलीस प्रमुख एच.डी. आनंदकुमार यांनी दिली. अयाज अहमद जमादार, उमर फारूक आणि राहिल अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

सोमवारी विजयपूर येथे बोलताना ते म्हणाले, १७ जानेवारी रोजी विजयपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर एक तरुणी बसची वाट पाहत उभी होती. यावेळी या तिघांनी तरुणीवर  लैंगिक अत्याचार करून तिला आपल्या दुचाकीवर बसून पळ काढला. हे प्रकरण गांभीर्याने घेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजच्या आधारे जिल्हा पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून  अवघ्या सहा दिवसात आरोपींना गजाआड केल्याचे त्यांनी सांगितले.