बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात २६ व २७ जानेवारी असे दोन दिवस तृणधान्य व सेंद्रिय कृषी मेळावा होणार असून २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय अन्नधान्य वर्ष” म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर मेळावा आयोजित केल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात पत्रकार परिषदेत माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कृषी विभाग आणि कृषी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील सरदार्स हायस्कूलच्या मैदानावर २६ आणि २७ जानेवारी रोजी तृणधान्य व सेंद्रिय कृषी मेळावा होणार आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते मेळ्याचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार अनिल बेनके असतील. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
तृणधान्यांबाबत जागरूकता :
नाचणी, बाजरी, जोंधळा यांसारख्या धान्यांपासून बनवलेले अन्न खाल्ल्यास माणूस सशक्त, उत्साही आणि निरोगी होऊ शकतो. त्यामुळे लोकांना तृणधान्य व सेंद्रिय अन्नधान्याची माहिती मिळावी आणि जनजागृती व्हावी, या उद्देशाने या दोन दिवसीय मेळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments