• हुबळी ग्रामीण पोलिसांची कारवाई 

हुबळी / वार्ताहर 

कौटुंबिक कारणावरून पत्नीची हत्या करणाऱ्या दोषी पतीला अटक करण्यात हुबळी ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. हुबळी तालुक्यातील कोळीवाडा गावात घडलेल्या या घटनेत पत्नीचा गळा चिरून खून करणाऱ्या आरोपी उदाचप्पा देवरमणी याला पोलिसांनी अटक केली आहे. शारदा देवरमणी असे  मृत पत्नीचे नाव आहे. हुबळी पोलीस स्थानकाचे निरीक्षक रमेश गोकाक यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.