सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील राजहंसगड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारली जात आहे. आज रविवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या कामाचा आढावा घेतला. त्याचबरोबर किल्ल्याच्या आत व बाहेर सुरू असलेल्या कामांची ही त्यांनी पाहणी केली.

यानंतर बोलताना आ.लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, सर्व कामे अंतिम टप्प्यात असून ज्येष्ठ व कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरात लवकर उद्घाटनाची तारीख निश्चित केली जाईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी  एपीएमसीचे माजी अध्यक्ष  युवराजअण्णा कदम, मनोहर बेळगावकर, युवक काँग्रेस नेते  मृणाल हेब्बाळकर, सातेरी बेलवटकर, भाऊराव पवार, पद्मराज पाटील, भागाण्णा नरोटी, सचिन सामजी, महावीर पाटील, गणपत मारिहाळकर आदी उपस्थित होते.