सुळगा (हिं.) / वार्ताहर
कर्तृत्वात लिंगभेद नसतो. जिद्द असेल तर महिला समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात, अशी तुमच्यासह लाखो उदाहरणे आहेत. महिलांच्या उत्कर्षासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. मतदारसंघातील मंडोळी गावात नव्याने स्थापन केलेल्या रणरागिणी महिला मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
गावातील महिलांनी संघटित होऊन महिला मंडळ स्थापन केले याचा आनंद आहे. या महिला मंडळाच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी विधायक उपक्रम राबवावे अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमास दीपा दशरथ साळवी, शालिनी परशराम कणबरकर, शोभा शिवाजी पाटील, सरस्वती दत्ता साळवी व महिला महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments