विजयपूर / दिपक शिंत्रे 

ऐतिहासिक विजयपूर शहरात पहिल्यांदाच 37 वे कर्नाटक राज्य पत्रकार संमेलन आयोजित करण्यात आले असून संमेलन यशस्वीसाठी सर्व पत्रकार, माध्यम प्रतिनिधींनी व नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष शिवानंद तगडूर यांनी केले.

जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, दि.23 व 24 डिसेंबर रोजी होणाऱ्या संमेलन काही कारणाने दि 9 व 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते मात्र ज्ञानयोग आश्रमाचे श्री सिद्धेश्वर स्वामींच्या निधनामुळे दुसऱ्यांदा संमेलन पुढे ढकलण्यात आले. श्री सिद्धेश्वर स्वामीजी संमेलनाचे सानिध्य भूषविण्यास आनंदानी मान्य केले होते, सीमा भागात होणारा राज्य पत्रकार संमेलन यशस्वीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या, श्री सिद्धेश्वर स्वामींच्या सानिध्यात होणारे संमेलन त्यांच्या अनुपस्थितीत होत आहे त्याबद्दल दुःख होत असल्याचे सांगितले.

ते पुढे म्हणाले, शहरातील कंदगल हनमंतराय रंगमंदिरात होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन दि. 4 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते करण्यात येणार असून,  तर दि. 5 फेब्रुवारी रोजी पत्रकार प्रतिनिधींनीचे समावेश होणार असून त्यानंतर कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा वार्षिक राज्यस्तरीय पुरस्कार प्रशस्ती प्रदान समारंभ होणार असून माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन व समारोप समारंभास अनेक मंत्री व स्थानिक जनप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या संमेलनास जवळपास पाच हजार पत्रकार बंधू उपस्थित राहणार असून आजपर्यंत तीन हजार पत्रकारांनी नाव नोंदणी केली आहे. तर विजयपूर जिल्ह्यातील 10 ज्येष्ठ पत्रकारांना गौरव सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष भवानीसिंग ठाकूर, जिल्हा अध्यक्ष संगमेश चुरी, मुख्य सचिव मोहन कुलकर्णी, उपाध्यक्ष इंदुशेखर मनूर, सचिव अविनाश बिदरी, खजिनदार राहुल आपटे,सह खजिनदार दिपक शिंत्रे,राज्य कार्यकारिणी सदस्य डी.बी. वडवडगी, के.के.कुलकर्णी, कौश पन्हाळकर, के.एन. रमेश, महिला विश्वविद्यालयाच्या पत्रिकाउद्धोम विभागाचे प्रमुख डॉ ओंकार काकडे व इतर उपस्थित होते.